"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

 देवठाण व भायखेडा  गाव हे येवला तालुका जिल्हा नाशिक मध्ये येते. गावापासुन जवळ नॅशनल हायवे NH75 महामार्ग जातो. तो नाशिक ते छत्रपती संभाजीनगर जोडलेला आहे. देवठाण गावापासुन तारूर रेल्वे स्थानक 5 की.मी. अंतरावर आहे व येवला रेल्वे स्थानक 25 कि.मी.आहे. हे दोन्हा गावे तालुक्यापासुन 24 कि.मी. अंरवार आहे. देवठाण व भायखेडा या दोन्ही गावामधुन देवनदी आहे. गाव हे पाणी टंचाई मध्ये आहे. गावाला 4 महीने पाण्याचा टॅकर चालु असता. तसेच सध्या 42 गाव पाणी पुरवठा योजना हे काम प्रगती पथावर आहे.तरी हीयोजना सुरू झाल्यानंतर पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार आहे.

देवठाण गाव हे हेमाडपंथी मंदीर (पुरातत्व शिव मंदीर), पुरातत्व विभाग भारत सरकार याच्या बाजुस वसलेले आहे. ते मंदिर 350 वर्षापुर्वीचे आहे. त्या मंदिर मध्ये देव देवताचे कोरीव काम आहे. हे मंदिर 3 एकर मध्ये वसलेले आहे. हे प्राचीन स्मारक 1958 च्या 24 व्या प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमन्वये राष्ट्रीय महत्वाचे जाहीर करण्यात आलेले आहे. तरी येथे वेरूळ व अंजिठा लेणी सारखे कोरीव काम करण्यात आलेले आहे.

             देवठाण गावामध्ये लक्ष्मीआई यात्रा व खंडोबा यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. या गावचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, लक्ष्मीआई मंदिर, मारूती मंदिर, महादेव मंदिर, शनीदेव मंदिर हे गावचे महत्वाचे मंदिर आहे.या ग्रामदैवताचे उत्सव मोठ्या प्रामाणात साजरा केले जातात.

 

पिंपळगाव जलाल: यशस्वी वाटचालीची गाथा

देवठाण व भायखेडा गावामध्ये 1 की.मी. अंतर आहे. नॅशनल हायवे NH75 महामार्ग खामगाव पाटी पासुन देवठाण 3 की.मी. अंतरावर आहे. देवठाण गावाच्या आजुबाजुस भुलेगाव, सुरेगाव रस्ता, खामगाव, पिंपळखुटे बु., पानव, चादगाव हे गावे आहेत. दोवठाण हे गाव वैजापुर तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे.             देवठाण व भायखेडा गाव हे पुर्ण शेतीवर अंवलबुन आहे. कांदा,मक्का,कापुस ,बाजरी हे महत्वाचे पिक घेतले जातात. दोन्ही गावे आनंदात उत्सव साजरे करतात व सर्व गुण्यागोंविदाने राहतात.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


399
2025
1015
1010

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo